डेटा म्हणजे निर्णय घेण्याचं इंधन!
आज डिजिटल मार्केटिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी भावनेपेक्षा अधिक गरज असते अचूक डेटा विश्लेषणाची.
तुमचं कोणतं पेज किती वेळ उघडलं जातं? ग्राहक कुठं अडकतो? किती जणांनी फॉर्म भरायचा विचार केला आणि मागे फिरले?
हे सगळं Google Analytics, Hotjar Heatmaps, Meta Pixel, UTM Tracking यांसारख्या टूल्समधून मिळतं – आणि हे समजून घेतल्याशिवाय तुम्ही खर्च करत राहता… पण परिणाम येत नाहीत.
आमचं Analytics Setup म्हणजे फक्त रिपोर्ट नव्हे – तो व्यवसायासाठी दिशा दाखवणारा आरसा आहे.
Website वर कोण येतंय, कुठून येतंय, काय करतंय?
Google वरून, Facebook Ads वरून, WhatsApp वरून – वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक तुमच्या वेबसाइटवर येतात.
पण तुम्हाला माहिती आहे का – त्यापैकी किती लोक खरंच तुमच्या service page वर गेले? किती जणांनी तुमचा नंबर बघितला? आणि किती जणांनी काही action न घेता बाहेर पडले?
Traffic येणं म्हणजे यश नाही – Conversion हेच खरं उद्दिष्ट आहे.
Analytics हे Conversion आणि वापरकर्त्याच्या प्रवासाचं (User Journey) पूर्ण चित्र दाखवतं.
तुमचा डेटा तुमचं यश ठरवतो – आजच स्पष्ट व्हा!
वेबसाईट आहे, जाहिरात चालू आहे – पण परिणाम हवेत ना? मग डेटा वाचा आणि पुढे जा!
6-Step Analytics Process
तुमच्या सध्याच्या कामाचं परीक्षण
– वेबसाइट, सोशल पेज, जाहिराती यांची पाहणी.
कुठून ग्राहक येतोय ते समजून घेणं
– कुठल्या माध्यमातून, कुठल्या शहरातून, कोणत्या उपकरणावरून.
वेबसाईटवरच्या वागणुकीचं विश्लेषण
– कुठे क्लिक केलं, किती वेळ थांबला, कुठे बाहेर पडला.
उत्पन्नात बदल करणारे मुद्दे ओळखणे
– फॉर्म, बटण, पृष्ठांची रचना तपासणे.
संपूर्ण मासिक रिपोर्ट तयार करणे
– सहज समजेल अशा भाषेत निष्कर्ष.
तुमच्यासोबत चर्चा करून पुढील पावलं निश्चित करणं
– सुधारणा, चाचण्या आणि कृती.
कसला खर्च, कसला फायदा – समजून घ्या!
कोणती जाहिरात काम करते, कोणत्या पोस्टवर लोक येतात, किती जण खरेदी करतात – हे जर समजलं नाही, तर सगळं अंदाजावरच चालतं.
आम्ही तुमच्या डिजिटल कामाचं मोजमाप करतो आणि दाखवतो की कोणत्या प्रयत्नाचा खरं फायदा होतोय, आणि कुठे पैसे वाया जातायत.
त्यामुळे पुढच्या योजना ठोस बनतात – आणि तुम्ही ‘वाट पाहणं’ बंद करून ‘नियोजन’ करू शकता.
डेटा नुसता गोळा नाही करायचा – तो अर्थपूर्ण करायचा!
सगळे reports मिळतात – पण तुम्ही त्यातून काय शिकलात, काय सुधारलं, काय सोडलं हे समजणं खूप महत्त्वाचं आहे.
आम्ही Data Studio Reports, Weekly Snapshots, Monthly Conversion Reports तयार करतो – आणि त्यामध्ये काय सुधारावं लागेल, कुठे performance कमी आहे, काय opportunity आहे हे स्पष्ट सांगतो.
डेटा म्हणजे तुमच्या व्यवसायाचा नकाशा – आणि आम्ही त्याचं वाचन करून दिशादर्शक ठरतो.