तुमचं WhatsApp बिझनेस अकाउंट – फक्त मेसेजसाठी की विक्रीसाठी सुद्धा?
तुमचं WhatsApp बिझनेस अकाउंट – फक्त मेसेजसाठी की विक्रीसाठी सुद्धा? आज तुम्ही WhatsApp बिझनेस वापरताय…✓ दुकानाचं नाव टाकलंय✓ वेळ दिलाय✓ Location दिली आहे✓ “Hi” पाठवल्यावर
वेबसाईट असावी वाटतं, पण कोण बनवून देईल याची माहिती नाही.
जाहिरात करावी वाटते, पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
Google वर नाव दिसावं, पण कुणाला सांगावं तेच कळत नाही…
आम्ही आहोत – GrowthMarketingWala.
एक अशी टीम – जी तुमच्या व्यवसायाला डिजिटल दुनियेत हाताला धरून उभं करते.
मराठीतून, समजून घेऊन, आणि शंका दूर करून !
आमच्याकडे विचारायचं तर Google Ads काय असतं? Funnel म्हणजे काय? – आम्ही सरळ समजावतो.
तुम्ही 5,000 चं काम सांगितलं आणि ते 15,000 मध्येच होणार असेल, तर आम्ही पहिल्याच दिवशी सांगतो.
वेबसाईट जर वापरताच आली नाही, तर ती नुसती शोभा आहे – आमचं काम म्हणजे वापरातली उपयोगिता वाढवणं.
Email टाकून 3 दिवसांनी रिप्लाय यायची वाट पाहायची गरज नाही – आम्ही 24 /7 संपर्कात असतो.
आजची बाजारपेठ ही फक्त चांगल्या उत्पादनांची नाही, तर चांगल्या सादरीकरणाची आहे. तुमचं प्रॉडक्ट जरी उत्तम असलं, तरी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म अत्यावश्यक आहे. आणि हाच भाग खूप जणांकडून दुर्लक्षित राहतो – विशेषतः मराठी भाषिक व्यावसायिकांकडून. आम्हाला हे समजतं की सगळ्यांना भारी मार्केटिंग भाषेत बोलणं जमत नाही, म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी ‘GrowthMarketingWala’ सुरू केलं.
आम्ही फक्त मार्केटिंग करत नाही – आम्ही तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने न्यायला सज्ज आहोत. मराठीतून, सोप्या भाषेत, आणि १००% पारदर्शक सल्ला देणारी ही तुमची स्वतःची डिजिटल टीम आहे.
आम्ही तुमच्या व्यवसायासाठी असा डिजिटल भागीदार आहोत, जो तुमचं काम समजून घेतो, त्यानुसार योग्य स्ट्रॅटेजी बनवतो आणि तशी अंमलबजावणीही करतो. आमच्या टीममध्ये डिजिटल तज्ज्ञ, UI-UX डिझायनर्स, SEO स्पेशालिस्ट, कंटेंट क्रिएटर्स आणि डेटा अॅनालिस्ट्स यांचा समावेश आहे – पण तुम्हाला ते कधीच जाणवणार नाही, कारण तुमच्याशी संवाद कायम एकदम सरळ आणि मराठीतूनच होईल.
प्रामाणिकपणा: काम झालं नाही, तर नाहीच म्हणतो. कारण तुमचं नुकसान आम्हालाही चालत नाही.
संवाद: तुम्हाला कधीही गोंधळ न वाटावा यासाठी सगळं एकदम स्पष्टपणे सांगतो.
नवीन ट्रेंड स्वीकारणं: नवीन ट्रेंड, टूल्स, प्लॅटफॉर्म यांचा उपयोग योग्य पद्धतीनं करतो.
ग्राहकप्रथम दृष्टिकोन: तुमचं व्यवसाय वाढणं हेच आमचं यश.
शेजारी ग्राहक Google वर “क्लिनिक जवळचं”, “चांगली बेकरी”, “घरी शिकवणं” टाईप करतो… आणि तुम्ही त्याच्या डोळ्यासमोर आला नाहीत – तर व्यवसायचं नाव मोठं कसं होईल? त्यासाठी लागतो GMB प्रोफाइल – आणि त्यात योग्य माहिती, दर्जेदार फोटो, नियमित अपडेट्स, आणि ग्राहकांचे रिव्ह्यू. आम्ही हे सगळं तुमच्यासाठी करत आहोत – विश्वासार्हपणे आणि व्यावसायिक पद्धतीनं.
आज वेबसाईट म्हणजे फक्त माहितीसाठी नाही – ती तुमचं डिजिटल दुकान आहे, तुमचं बिझनेस कार्ड, आणि विश्वासाचं प्रतीक सुद्धा. आम्ही तुमच्यासाठी अशा वेबसाईट बनवतो जी मोबाईलवर छान दिसते, कॉल/WhatsApp करण्याचं सोपं बटन असतं, ग्राहकाला काय करता हे सहज समजतं, आणि मराठीतून बोलते. कोडिंग, टेक्निकल गोष्टी – काहीही लागणार नाही. सगळं आम्ही सांभाळतो.
Instagram आणि WhatsApp – हेच आजचे बाजारपेठ आहेत. तुमचा ब्रँड तिथं “दिसला पाहिजे, वाचला पाहिजे, आणि लक्षात राहिला पाहिजे.” तुमच्यासाठी आम्ही तयार करतो: WhatsApp creatives, Instagram posts, reels, stories आणि उत्सव/ऑफर यांचं मराठी कंटेंट. तुमचं काम फक्त शेअर करणं – सगळा विचार, रचना आणि डिझाईन आमच्याकडून.
ग्राहक फक्त एकदाच खरेदी करावा हे कुणाला हवं असतं? ई-मेल म्हणजे संवाद ठेवणं, आठवण करून देणं, आणि पुन्हा भेट घडवणं. आम्ही ई-मेल सिस्टिम तयार करतो: Welcome series, Regular offers, Weekly updates, Feedback collection सगळं सेटअप – आपोआप चालणारं, पण तुमचं control राहणारं.
बजेट कमी असेल, तरी ग्राहक वाढवता येतात – फक्त जाहिरात हुशारीने चालवायला हवी. आम्ही तुमच्यासाठी तयार करतो: Search Ads (Google वर शोधणाऱ्यांना थेट तुमचं नाव!), Facebook Lead Ads (लक्ष्यित ग्राहकाची माहिती गोळा करणं), 👉 ₹200 पासून सुरू करूया – आणि WhatsApp वर थेट मेसेज येईल असं
Data नसेल तर तुम्ही अंधारात निर्णय घ्याल. Analytics म्हणजे – कुठून ट्रॅफिक आलं? कोणी Call केलं? किती लोकांनी WhatsApp केलं? हे सगळं Google Analytics, Facebook Pixel, Call Tracking च्या मदतीनं ट्रॅक केलं जातं. आणि हो – आम्ही ते सगळं मराठीतून समजावतो.
छोट्या व्यवसायांसाठी Digital Marketing म्हणजे काय? रोज Instagram पोस्ट टाकून काही फायदा होतो का? आणि "Google वर नाव येणं" इतकं महागडं आहे का? आमच्या ब्लॉगमध्ये अशा अनेक प्रश्नांची उत्तरं, केस स्टडीज आणि उपयोगी टिप्स मिळतील – सोपी, मराठीत, तुमच्या बिझनेससाठी.
तुमचं WhatsApp बिझनेस अकाउंट – फक्त मेसेजसाठी की विक्रीसाठी सुद्धा? आज तुम्ही WhatsApp बिझनेस वापरताय…✓ दुकानाचं नाव टाकलंय✓ वेळ दिलाय✓ Location दिली आहे✓ “Hi” पाठवल्यावर
सोशल मीडियावर तुम्ही सक्रीय आहात, पण विक्री होत नाही – का?</h1> तुम्ही Instagram वर reels टाकता. Facebook पेजवर दररोज पोस्ट करता. WhatsApp स्टोरी ठेवता.Follow पण
सकाळी ८ वाजता एक आई उठते, मोबाईल उघडते आणि Google वर टाकते –“Best English tutor near me” एक नवीन नवरा होणारा मुलगा Google वर शोधतो
“तुम्ही सांगता की आमचं काम चांगलं आहे. पण ग्राहकांनी विश्वास ठेवावा, तर तो विश्वास बंधायला हवा ना? फक्त मी सांगतोय म्हणून कुणी येणार नाही!” हीच
आज तुम्ही तुमचं दुकान चालवताय, सेवा देताय, क्लासेस घेताय, किंवा दवाखाना चालवताय. एक दिवस कुणीतरी सांगतं, “वेबसाईट करून घ्या… लोक Google वर बघतात आता.” तुम्ही
तुमचा स्पर्धक Google वर आहे… आणि तुम्ही नाही – याचा अर्थ काय? तुमचं काम चांगलं आहे. ग्राहकांनी समाधानी होऊन परत येण्याचा रेटही बरा आहे. दुकानाची
तुमच्याकडे एखादं Business आहे, पण Online काहीच चालत नाहीये? किंवा Website आहे पण enquiry नाही मिळत? Facebook वर जाहिरात केली पण पैसे वाया गेले? एक काम करा – WhatsApp करा. आम्ही तुमचं काम ऐकून समजून घेऊ – मगच सल्ला देऊ. कोणतीही जबरदस्ती नाही, कोणतंही "पॅकेज" नाही.
ग्रोथ मार्केटिंग वाला ही एक आधुनिक डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे जी खास मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि स्थानिक उद्योगांसाठी तयार झाली आहे.
आमचं ध्येय एकच — तुमचं डिजिटल अस्तित्व बळकट करणं आणि तुम्हाला ऑनलाईन वाढवून देणं.
आपण वेबसाईट, सोशल मीडिया, SEO, जाहिरात, आणि डेटावर आधारित निर्णय घेण्याच्या बाबतीत सोप्या आणि स्पष्ट मार्गदर्शनाने काम करतो.
आम्ही तुमचं बजेट, मार्केट, आणि ग्राहक समजून घेऊनच सल्ला देतो — कोणतेही गोंधळ नाही, केवळ सत्यता आणि स्ट्रॅटेजी!
काही विचारायचं आहे? तुमचं मार्केटिंग, वेबसाईट किंवा जाहिरात सल्ला हवाय?
आम्ही तुमचं उत्तर WhatsApp वर लगेच देतो!
👇 फक्त क्लिक करा आणि तुमचा मेसेज पाठवा —
तुमचं वेळ वाचवा आणि मार्केटिंग सुरू करा.