Google वर नाव हवंय? मग ग्राहकांसमोर उभं राहा – आजच!

🌍 “Google वर दिसाल, तेव्हाच ग्राहक तुमच्याकडे येतील”

आजकाल कुठलाही ग्राहक जेव्हा एखादं उत्पादन किंवा सेवा शोधतो, तेव्हा तो सर्वप्रथम Google वापरतो. तो विचार करत नाही की कुणाकडे विचारावं — तो फक्त ‘जवळचं हार्डवेअर दुकान’, ‘अवलेबल प्लंबर’, ‘पिंपरीत डेंटिस्ट’, ‘घरी शिकवणारा शिक्षक’ असं शोधतो.
पण लक्षात घ्या — या शोधांमध्ये तुमचं नाव Google वर येतंय का?
जर नाही, तर तुम्ही बघताही न बघता हजारो ग्राहक गमावता आहात.

Local SEO ही त्या शोधांमध्ये आपलं नाव, लोकेशन, मोबाईल नंबर, वेळा, फोटो, रिव्ह्यू इ. योग्य पद्धतीने दाखवण्यासाठीची यंत्रणा आहे.
Google My Business प्रोफाइल नीट सेट करणं, keywords टाकणं, रेटिंग्स वाढवणं – हे सगळं तुमचा ‘ऑनलाईन दरवाजा’ उघडतं.

शोधा, दिसा, विश्वास मिळवा – SEO हेच तुमचं डिजिटल ओळखपत्र.

🔍 SEO म्हणजे फक्त टेक्निकल गोष्ट नाही – ती ब्रँडची ओळख आहे

General SEO म्हणजे वेबसाइटवर केलेलं काम – जे Google ला सांगतं, की ह्या पेजवर ‘हे माहिती आहे’, ‘हे सेवा आहेत’, आणि ‘ही कंपनी खरंच आहे’.
वेबसाइटवर title, meta description, headings, image alt text, keyword relevance, linking, site speed… या सगळ्याची ‘मांडणी’ नीट नसेल, तर Google तुमचं पेज पाहतच नाही.

बाहेरून वेबसाइट सुंदर असली तरी Google ला ती ‘डोळ्यांनी’ दिसत नाही – ती त्याच्या algorithms ना ‘भाषेतून आणि कोडमधून’ समजते. SEO म्हणजे ती भाषा आणि कोड Google साठी व्यवस्थित लिहून देणं.

जवळचं व्यवसाय शोधलं की तुमचंच नाव वर यायला हवं – आम्ही ती जबाबदारी घेतो.

आता निर्णय घ्या – डिजिटलमध्ये पहिला नंबर लागवा!

जिथे ग्राहक शोधतो, तिथे तुम्ही असलाच पाहिजे – बाकी आम्ही बघतो!" आता SEO करणं म्हणजे मोठ्या कंपन्यांचा खेळ राहिलेला नाही – मराठी लोकांसाठी, स्थानिक व्यवसायांसाठी आम्ही ही सेवा सुटसुटीत व योग्य बजेटमध्ये देतो.

वेबसाईट आहे? पण Google ला कळायला SEO लागतो – आम्ही ती भाषा समजतो.

🛠️ आमचं ६ टप्प्यांचं संपूर्ण कार्यपद्धतीचं मॉडेल

व्यवसाय समजून घेणं (Foundational Research)

आमचं पहिलं काम म्हणजे तुमचं बिझनेस नीट समजून घेणं – तुम्ही कोणत्या भागात आहात, काय विकता, कोण तुमचा ग्राहक आहे, त्याला काय माहिती लागत असते, आणि तो नेहमी कोणत्या अडचणीत असतो – हे सगळं नीट समजल्याशिवाय योग्य SEO करता येत नाही.

Google My Business ऑप्टिमायझेशन

तुमचं GMB प्रोफाइल नवीन असेल तर ते तयार करतो, आधीपासून असेल तर त्यात सुधारणा करतो. – Business Categories, Services, Photos, Description – Timings, Attributes, WhatsApp क्लिक बटन – Review Requests, Replies व स्टार रेटिंग स्ट्रॅटेजी

Website SEO ऑडिट

तुमच्या वेबसाईटवर कोणत्या गोष्टी Missing आहेत, कोणी त्यावर क्लिक केल्यावर कुठे अडकतो, site speed काय आहे, मोबाइलवर ती नीट दिसते का – हे सगळं चेक केलं जातं.

स्थानिक भाषेतील Keyword Research

आम्ही व्यवसाय समजल्यावर त्यासाठी योग्य keywords शोधतो – उदा. "पिंपरी मध्ये होम ट्यूशन", "साताऱ्यातील ट्रॅव्हल एजन्सी", "शेगाव मध्ये डॉक्टर". हे शब्द Google वर किती वेळा शोधले जातात, तेही बघितलं जातं.

On-Page आणि Technical सुधारणा

– Meta Titles, Descriptions, Alt Tags, Internal Linking – Page Load Speed, Mobile Friendliness, Image Optimization – Schema Markup, Location Data Embeds सगळं तुमच्या वेबसाइटमध्ये सोपं आणि साफसफाईनं केलं जातं.

दर महिन्याचा अहवाल आणि पुढील दिशानिर्देश

Google Search Console, Analytics, Clicks-to-Call डेटा, GMB Performance हे सगळं तुम्हाला मराठीतून व WhatsApp वरून दिलं जातं. त्यामुळे तुम्हाला खात्री असते की काहीतरी सुरू आहे – आणि ते वाढतंय!

आमच्या दृष्टिकोनाचं वेगळेपण काय?

आम्ही केवळ इंग्रजी तज्ञ नसलो तरी ‘ग्राहक कसा विचार करतो’ याची समज आहे.
आम्ही SEO करताना फक्त Search Engine साठी नाही, तर माणसांसाठी काम करतो.
मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषांच्या मिश्रणातून स्थानिक व्यवहारातले keywords निवडतो — जे खरंच तुमच्या ग्राहकाला उपयोगी ठरतात.

आमच्या कामाची पद्धत म्हणजे “Google ला समजणं” + “ग्राहकाला पटवणं”
या दोन्ही गोष्टी मिळूनच बिझनेस वाढतो.

स्थानीय ग्राहक, स्थानिक सर्च, स्थानिक SEO – तुमच्यासाठी खास.

📌 तुम्हाला ही सेवा का घ्यावी?

✅ तुमचं नाव Google वर दिसणार
✅ ग्राहक फोन करणार
✅ वेबसाइटवर ट्रॅफिक वाढणार
✅ Paid Ads शिवाय बिझनेस येणार
✅ तुमचं नाव ‘लोकल ब्रँड’ म्हणून उभं राहणार

error: Content is protected !!
Scroll to Top